22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादधाराशीव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड, कारवाई सुरूच

धाराशीव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड, कारवाई सुरूच

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील चोराखळी येथील धाराशीव साखर कारखान्यावर गुरूवारी दि. २५ रोजी पहाटे आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाच्या अधिका-यांकडून कारवाई सुरू आहे.
अभिजीत पाटील अध्यक्ष असलेल्या चोराखळी येथील धाराशीव साखर कारखान्यावर गुरूवारी पहाटे आयकर विभागाच्या अधिका-यांनी धाड टाकून तपासणी सुरू केली आहे.

अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील आहेत. ते गेल्या वर्षापासून साखर सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ताब्यात एकूण ३ खासगी व २ सहकारी साखर कारखाना ताब्यात आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी, सांगोला सहकारी कारखाना, नाशिक व नांदेड येथे प्रत्येकी एक, चोराखळी येथील धाराशीव कारखाना असे पाच कारखाने आहेत. अभिजीत पाटील यांच्या खासगी साखर कारखान्यावर धाड पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या