18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयजम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांच्या प्रमाणात वाढ

जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांच्या प्रमाणात वाढ

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले काही नवीन राहिले नाहीत. यामध्ये सामान्य नागरिकांचा मृत्यू होतो आणि अनेक जवानही हुतात्मा होतात. मात्र, दहशतवाद्यांनी हल्ल्याची आता नवीन पद्धत अवलंबली आहे. हल्लेखोर ओळखू येऊ नयेत म्हणून दहशतवादी संघटनांनी अवलंबलेल्या या नवीन पद्धतीमुळे सुरक्षा यंत्रणांची मात्र मोठी चिंता वाढली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूँछमध्ये सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ल्यात लष्कराच्या एका कनिष्ठ अधिका-यासह ५ जवानांना वीरमरण आले.

दहशतवादी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीमही सुरू केली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दहशतवादी येतात आणि हल्ले करून पळून जातात. मात्र, त्यानंतर ते दहशतवादी परत कधीच सापडत नसल्याचे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे सध्या दहशतवाद्यांनी एक नवीन मार्ग शोधला आहे, ज्यामुळे लष्करासाठी दहशतवाद्यांना ओळखून शोधून काढणे अवघड होऊन बसले आहे. कोणाला लहान बाळ तर कोणाचे नुकतेच झालेले लग्न, तर दुसरीकडे, लष्कराने, जम्मू-काश्मीर खो-यामधील संशयित तरुणांच्या कुटुंबासह नवीन दहशतवाद्यांच्या भरतीवरही जवळपास नियंत्रण ठेवले आहे.

लष्कराने अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणले आहे. या कारणांमुळे दहशतवादी संघटनांना दहशतवाद्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांनी अर्धवेळ म्हणजे पार्ट टाईम दहशतवाद्यांकडून हल्ले करण्याची पद्धत स्वीकारली आहे.

हँडलर्संना पकडले
खो-यात असलेल्या हँडलर्सना पाकिस्तानकडून पाठवलेले संदेश लष्करी गुप्तचरांनी पकडले आहेत. या संदेशामधून दहशतवादी संघटना हल्ले करण्याची नवीन पद्धत अवलंबत असल्याचं उघडकीस आलं. हे संदेश खो-यातील स्लीपर सेल्सच्या हँडलर्सकडे येत असतात. पूर्वी सामान्य लोकांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले हल्लेखोर नवीन होते.

हल्ल्यांनंतर जगतायेत सामान्य जीवन
त्यांच्याकडून यापूर्वी असा हल्ला झाल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. त्यामुळे दहशतवादी संघटना मोठी रक्कम देऊन त्यांचा फक्त एका हल्ल्यात वापर करत आहेत. त्यानंतर दहशतवादी संघटना त्यांच्याशी संबंधही तोडत आहेत. हे दहशतवादी तो हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये सामान्य जीवन जगतात.

लष्कराला शोध घेणे झाले कठीण
लष्कराला त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे. सुरक्षा दलांना १० घटनांमध्ये अशा अर्धवेळ दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे आढळले आहे. दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, एके ४७ सह मोठा शस्त्रसाठाही जप्त केंद्र सरकारने काश्मिरी स्थलांतरित आणि पश्चिम पाकिस्तानी शरणार्थींना ४१ लाखांहून अधिक निवास प्रमाणपत्रे दिली आहेत. यामुळे मुस्लिमेतर लोक खूश झाले. परिणामी पाकिस्तानात बसलेले दहशतवादी खवळले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून केवळ हिंदूच नव्हे तर शिखांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यामध्ये यामुळे दहशत पसरली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या