नवी दिल्ली : वृत्त संस्था – ईपीएफओचे लाखो सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने योजनेत सहभागी होणासाठी मासिक वेतन मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा 6,500 रुपये प्रति महीना होती, जी आता वाढवून 15,000 रुपये प्रति महीना केली आहे. यासोबतच आता त्या सर्व लोकांना पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार नाही, ज्यांचे वेतन, योजनेत सहभागी होताना 15 हजारपेक्षा जास्त होते.
ईपीएस योजना म्हणजे कर्मचारी पेन्शन स्कीमच्या हेतूने वेतनात, मुळ वेतन आणि महागाई भत्ता जोडला जातो. यामुळे आता बदललेल्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचार्याचे बेसिक म्हणजे मुळ वेतन आणि डीए मिळून 15,000 रुपये प्रति महीनापेक्षा जास्त रक्कम होत असेल तर त्यास आता ईपीएसची पात्रता राहणार नाही. कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) प्रामुख्याने कर्मचारी हितासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. तिचे संचालन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) करते. या योजनेत 58 वर्षाच्या वयात कर्मचार्याला पेन्शन मिळते, जे संघटीत क्षेत्रात कार्यरत असतात. या योजनेचा लाभ केवळ त्यास मिळतो, ज्याने कमीतकमी 10 वर्षापर्यंत नोकरी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये लागोपाठ सेवाकाळ होणे बंधनकारक नाही.
ईपीएसचे लाभ
योजनेचा सदस्य 58 वर्षाच्या वयात निवृत्त झाल्यानंतर पेन्शन लाभासाठी पात्र होतो. जर कुणी सदस्य 58 वर्षाच्या अगोदर 10 वर्ष सेवेत राहिला नसेल, तर तो फॉर्म 10 सी भरून 58 वर्षाच्या वयानंतर पूर्ण रक्कम काढू शकतो. पण त्यास रिटायर्डमेंटनंतर मासिक पेन्शन मिळणार नाही. ईपीएफओ सदस्य जो स्थायीदृष्ट्या अपंग झाल्यास, त्यास पेन्शन मिळेल, जरी त्याने आवश्यक 10 वर्ष नोकरी केलेली नसेल.
ईपीएसमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता
- – सर्वप्रथम ईपीएफओ मेंबर होणे आवश्यक आहे.
- – तुमच्या नोकरीला किमान दहा वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत.
- – यामध्ये वयोमर्यादा 58 असणे अनिवार्य आहे.
- – जर तुमचे वय 50 वर्ष आहे तर आपण कमी दरात आपली ईपीएस रक्कम काढू शकता.
- – या योजनेत तुम्ही 60 वर्षाच्या वयापर्यंत आपली पेन्शन टाळू सुद्धा शकता. असे केल्यानंतर तुम्हाला प्रति वर्ष 4 टक्केच्या अतिरिक्त दराने पेन्शन मिळेल.
असे करा पेन्शनचे कॅलक्युलेशन
सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला ईपीएसअंतर्गत प्रत्येक महिन्याला किती पेन्शन दिली जाईल, ते या गोष्टीवर ठरते की, पेन्शन योग्य तुमच्या वेतनाची रक्कम किती होती. तसेच तुम्ही एकुण किती वर्षे पेन्शन मिळवण्यायोग्य सेवा केली आहे. कोणत्याही पीएफ खातेधारक सदस्याच्या मंथली पेन्शनची रक्कम कॅलक्युलेशन या फार्म्युलाने करता येते. यामध्ये पेन्शन = सॅलरी द सेवाकाळाची वर्षे /70 च्या आधारावर केले जाते. कोणत्याही पीएफ खातेधारकाची पेन्शन योग्य सॅलरी त्याच्या गत एक वर्ष म्हणजे 12 महिन्याच्या मासिक वेतनाच्या एव्हरेजच्या बरोबर असते. अशाप्रकारे, ईपीएफओचा सदस्याचा वास्तविक सेवा कालावधी त्या कर्मचार्याच्या पेन्शन योग्य सेवा म्हणून मानला जाईल. पेन्शनच्या योग्य सर्व्हिस टर्मची गणना करताना अनेक कंपन्यांमध्ये, मालकांकडे केलेल्या नोकरीचा कालावधी म्हणजे सेवाकाळ जोडला जातो.