24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात तपासणी लॅबची संख्या वाढविली : अमित विलासराव देशमुख यांची माहिती

राज्यात तपासणी लॅबची संख्या वाढविली : अमित विलासराव देशमुख यांची माहिती

एकमत ऑनलाईन

आठवड्यात १०० व्या लॅबचे लोकार्पण होणार – वैद्यकीय उच्चशिक्षणमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची माहिती

प्रतिनिधी/सोलापूर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे. काही अडचणी योजनेस निर्माण होत असल्याची तक्रार प्राप्त होत आहेत. या योजनेत स्पष्टता आणणार आणि देशात संसर्ग तपासणी लॅबची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आहे. प्रारंभी दोन ते तीन लॅब उपलब्ध होत्या. येणाºया आठवड्यात १०० व्या लॅबचे लोकार्पण होणार असल्याची माहिती वैद्यकीय उच्चशिक्षणमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

विविध समस्या जाणून घेत स्थानिक स्तरावर तात्काळ सोडवण्यात आल्या
रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मनपा आयुक्त, सीईओ आणि पोलिस प्रशासनाची बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान प्रशासनाच्या विविध समस्या जाणून घेत स्थानिक स्तरावर तात्काळ सोडवण्यात आल्या तर उर्वरित समस्या राज्यस्तरावरून सोडवण्यात येईल, अशी हमी यावेळी ना. देशमुख यांनी दिली.  या बैठकीस आमदार प्रणितीताई ंिशदे, जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Read More  चीनमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; 19 जणांचा मृत्यू, 172 जखमी

सोलापुरातील कोरोना प्रसार शहराच्या ठराविक भागात
ना. देशमुख पुढे म्हणाले की, सोलापुरातील कोरोना प्रसार शहराच्या ठराविक भागात आहे. त्या भागात आणि मुंबईच्या धारावी परिसरात काहीअंशी साम्य आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या त्याचा अभ्यास करुन त्याप्रमाणे उपाययोजना सोलापुरात राबवाव्यात.

खाजगी रूग्णालयात उपचार घेणाºयांवर आर्थिक ताण पडणार नाही
प्रसार वाढणार नाही यासाठी फिल्डवर आणि बाधित व्यक्तींवर रुग्णालयात उपचार अशा दोन आघाड्यांवर कोविड-19 विरुध्दची लढाई लढायची आहे. शहरात आणि ग्रामीण भागात दर 15 दिवसांनी तपासणी करायला हवी. विशेषकरून वयस्कर आणि मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग अशा आजार असणाºया व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवायला हवे. तसेच खाजगी रूग्णालयात उपचार घेणाºयांवर आर्थिक ताण पडणार नाही, याची खबरदारीची दक्षता घेण्यात आली आहे. सोलापूरसाठी तज्ञ डॉक्टरांचे एक पथक पाठविण्याचा विचार केला जाईल. खासगी दवाखान्यात कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांना शासकीय दरानुसार पैसे आकारले जावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी सोलापूरसाठी स्वतंत्र पथकांची मागणी केली होती. आमदार प्रणिती ंिशदे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या उपचारासाठी स्वतंत्र उपाययोजना करायला हव्यात, असे सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या