23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजन‘भाईजान’च्या सुरक्षेत वाढ

‘भाईजान’च्या सुरक्षेत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. आता मुंबई पोलिसांचे अर्धा डझन जवान सलमानच्या खासगी बॉडीगार्डसह त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत असतील. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड गोल्डी ब्रार याने मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘रेडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने आखला होता. सिद्धू मूसेवाला प्रकरणी बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

‘आम्ही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. राजस्थानची टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताची अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्याच्या अपार्टमेंटच्या आसपास पोलीस हजर असतील,’असे मुंबई पोलिस अधिका-याने सांगितले.

जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्स. यापूर्वी सलमानच्या काळवीट शिकार प्रखरणी लॉरेन्स बिश्नोईने २००८ मध्ये जोधपूर कोर्टात सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जोधपूर कोर्टात गँगस्टर लॉरेन्स. यापूर्वी सलमानच्या काळवीट शिकार प्रखरणी लॉरेन्स बिश्नोईने २००८ मध्ये जोधपूर कोर्टात सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटला पवित्र मानतो आणि त्याची शिकार केल्याबद्दल सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

जोधपूरमध्ये हत्या करण्याचा आखला होता कट
२००८ मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे उघडपणे म्हटले होते. ‘आतापर्यंत मी काहीही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारले तेव्हा तुम्हाला कळेलच. सध्या मला उगाच या प्रकरणात खेचले जात आहे’ असे तो म्हणाला होता.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची दहशत आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तेथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला येथील अबोहर भागातील रहिवाशी आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या