23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाभारताची श्रीलंकेवर मात; महिला संघाचा हरमनप्रीतच्या नेतृत्वात पहिला विजय

भारताची श्रीलंकेवर मात; महिला संघाचा हरमनप्रीतच्या नेतृत्वात पहिला विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय महिला वनडे संघाची नियमित कर्णधार बनलेल्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना ४ गडी राखून जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेचा डाव १७१ धावांवर संपुष्टात आला.

संघाची मधल्या फळीतील फलंदाज नीलाक्षी डी सिल्वाने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. संघाच्या सहा खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. दीप्ती शर्मा आणि रेणुका सिाने प्रत्येकी ३ बळी घेतले. पूजा वस्त्राकरने २ गडी टिपले.

प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधना (४) व यास्तिका भाटिया (१) आपल्यापावली परतल्या. हरमनप्रीत व शेफाली (३५) यांनी तिस-या गड्यासाठी ४४ धावा आणि हरमनप्रीत (४४) व हरलीन (३४) यांनी चौथ्या गड्यासाठी ६२ धावा, दीप्ती (२२ ) व पूजा (२१ ) यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद ३८ धावांची भागीदारी करत संघाला विजयी केले.

पूजाने षटकार ठोकून विजय साकारला. दरम्यान, हरमनप्रीतच्या वनडेमध्ये ३ हजार धावा पूर्ण झाल्या. मिताली राज (७८०५) नंतर हा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय खेळाडू बनली. तिने ११९ वनडेत ३०२६ धावा केल्या. दीप्ती शर्मा सामनावीर ठरली. मालिकेतील दुसरा वनडे ४ जुलैला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या