28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाहरारेवर भारताने झिम्बव्वेला हरविले, भारताने मालिका ३.० ने जिंकली

हरारेवर भारताने झिम्बव्वेला हरविले, भारताने मालिका ३.० ने जिंकली

एकमत ऑनलाईन

हरारे : भारताने तिस-या एकदिवशीय सामन्यात झिम्बाब्वेला दिलेल्या २९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने झुंजार ११५ धावांची शतकी खेळी करत भारताचे टेन्शन वाढविले होते. मात्र अखेर भारताने शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना १३ धावांनी जिंकत मालिका ३-० अशी खिशात टाकली.

भारताने ठेवलेल्या २९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात खराब झाली. दीपक चाहरने त्यांना पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेच्या सेन विलियम्स आणि टॉनी मोनयोंंगा यांनी दुस-या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने चांगला मारा करत झिम्बाब्वेचा अवस्था ५ बाद १२२ धावा अशी केली. परंतु झिम्बाब्वेच्या मधल्या फळीने झुंजार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. अनुभवी सिकंदर रझाने झुंजार शतकी खेळी केली. सिकंदरने ८७ चेंडूत शंभरी पार केली. त्याने आठव्या विकेटसाठी ब्रॅड इवान्स यांच्यासोबत अर्धशतकी ८० भागीदारी रचली. या दोघांनी झिम्बाब्वेला २५० धावांपर्यंत मजल मारून दिली.

दरम्यान, सामना १८ चेंडूत ३३ धावा असा जवळ आला असताना आवेश खान टाकत असलेल्या ४८ व्या षटकात १६ धावा दिल्या. अखेर आवेशने शेवटच्या चेंडूवर इव्हान्सला २८ धावांवर बाद केले. याचबरोबर सिकंदर आणि इव्हान्सची ७५ चेंडूत केलेली १०३ धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आणली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या