24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडापहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून विजय

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून विजय

एकमत ऑनलाईन

हरारे : भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे संघाला त्यांच्याच भूमीत १० गडी राखून मात दिली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० ची आघाडी देखील घेतली आहे. सामन्यात आधी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू अक्षर पटेलच्या भेदक मा-यापुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

१८९ धावांवर झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला, त्यानंतर भारताचे सलामीवीर शुभमन गिल नाबाद ८२ आणि शिखर धवन नाबाद ८१ धावा काढत दोघांनी संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. सामन्यात सर्वात प्रथम भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया यांना बाद करून दीपक चहरने झिम्बाब्वेच्या संघाला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघाने सातत्याने विकेट्स गमावली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वाने सर्वाधिक ३५ धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा(३३ धावा) आणि ब्रॅडली इवांसने(नाबाद ३४ धावा) अखेरिस फटकेबाजी केली.

ज्यामुळे झिम्बाब्वेच्या संघाला ४०.३ षटकांत १८९ धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, फिरकीपटू अक्षर पटेलच्या खात्यातही तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या