29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत-चीन १४ वी फेरीही फिस्कटली

भारत-चीन १४ वी फेरीही फिस्कटली

एकमत ऑनलाईन

लेह : लडाखमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष मिटवण्यासाठी भारत आणि चीनमदरम्यान सुरु असलेली लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची चौदावी फेरीही आज निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नसून वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या उपायांवर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेचा वेग कायम ठेवण्यासाठी पुढील फेरी लवकरच होणे अपेक्षित आहे.

दोन्ही देशांकडून याप्रकरणी प्रसिद्धीपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पार पडली होती. तर ३१ जुलै रोजी बाराव्या फेरीची चर्चा झाली होती. दोन्ही देशाच्या परराष्ट्र नेत्यांची एससीओ शिखर बैठकीच्या निमित्ताने दुशान्बे येथे १६ सप्टेंबर रोजी भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही लष्करांनी गोग्रा भागात माघारीची प्रक्रिया पूर्ण केली होती. पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही फेरी महत्त्वाची ठरली होती. मात्र या चर्चेत चीनला माघार घेण्यापासून प्रवृत्त करण्यास भारताला अपयश आले.

पँगाँग सरोवरावर पूलाने चीनला फायदा?
पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडे खुर्नाक फोर्ट आणि दक्षिणेकडे मोल्डो या ठिकाणी चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या छावण्या आहेत. दोहोंतील अंतर जवळपास २०० किलोमीटरचे आहे. सरोवराला वळसा घालून हे अंतर गाठण्याऐवजी, ५०० मीटर लांबीचा पूल बांधून हा प्रवास १२ तासांवरून तीन-चार तासांपर्यंत आणण्याची योजना आहे. यात आपल्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे प्रस्तावित पूल प्रत्यक्ष ताबारेषेपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. पुलामुळे सैनिक आणि सामग्री तत्परतेने हलवणे चीनला शक्य होईल.

चीनच्या तुलनेत भारताची स्थिती
बूमरँगच्या आकाराच्या पँगाँग सरोवराच्या एकतृतीयांश भागावर भारताचा ताबा आहे. पुलापासून २० किलोमीटरवर फिंगर एट हा पुढे आलेला पर्वतीय भाग भारताच्या दृष्टीने प्रत्यक्ष ताबारेषा आहे. खुर्नाक फोर्ट हा पूर्वी भारताच्या ताब्यातील भूभाग, १९५८पासून या भागावर चीनचा ताबा आहे. गलवान संघर्षांमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर ज्या मोजक्या भूभागांमधून परस्परसंमतीने दोन्ही देशांनी सैन्यमाघार घेतली, त्यांत पँगाँग सरोवर परिसर आहे. मात्र तत्पूर्वी झटपट हालचाली आणि हुशारी दाखवून भारतीय सैन्याने पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील कैलाश पर्वतरांगातील निर्मनुष्य शिखरांवर कब्जा केला. ही नामुष्की चीनच्या जिव्हारी लागलेली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या