28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयभारताने गुलामगिरीची निशाणी उतरवली : पंतप्रधान मोदी

भारताने गुलामगिरीची निशाणी उतरवली : पंतप्रधान मोदी

एकमत ऑनलाईन

कोची : आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल १३ वर्षे लागली, अशी आयएनएस विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी नवीन नौदल चिन्हाचे ही अनावरण केले आहे.
भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवले आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करताना दिली आहे.

महिलांना आता नवी जबाबदारी
युद्धभूमीवर महिलांना सामील केलं जात आहे. महिलांना आता नवी जबाबदारी देण्यात येत आहे. येत्या काळात नौदल अधिक सक्षम होईल. तीनही दलात आता महिलांचा समावेश.

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण
नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले. आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली.

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत
देशांच स्वप्न पूर्ण होत आहे. आज देशाच्या नव्या भविष्याचे उदय होत आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विक्रात अमृत महोत्सवातील अतुलनिय अमृत आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिंिबब म्हणजे विक्रांत. भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत. कितीही मोठं आव्हान असो भारतासाठी काहीही अशक्य नाही. सर्व वैज्ञानिक आणि कर्मचा-यांचे अभिनंदन. आज इतिहास बदलणार आणखी एक काम झालं. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली. भारताने नौदलाला महत्त्व दिलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या