वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणा-या प्रेसिंडेशिअल डिबेटमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा आरोप केला. कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या भारताने लपवली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
अध्यक्षीय वादविवादात विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्या मुद्द्यांना उत्तरे देताना दमछाक झाली. अमेरिकेत कोरोनाबाधितांची आणि मृतांच्या वाढत्या संख्येचा मुद्या या वादविवादात उपस्थित झाला. त्यावेळी ट्रम्प यांनी भारतावर बेछूट आरोप केले. चीन, रशियावरही आरोप केले.बायडन यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, भारत, चीन आणि रशियात किती लोकांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे, याची कल्पना तुम्हाला नाही.
भारत, चीन आणि रशियाने मृतांची योग्य संख्या जाहीर केली नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.बायडन यांनी ट्रम्प यांच्याकडे कोणतेच नियोजन नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निधीदेखील नसल्याचा आरोप केला. ट्रम्प हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका बायडन यांनी केली.
आरे वृक्षबचाव आंदोलकांवरील गृन्हे मागे !