24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाभारत-हॉंगकॉंगमध्ये बुधवारी लढत

भारत-हॉंगकॉंगमध्ये बुधवारी लढत

एकमत ऑनलाईन

दुबई : सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला मात दिल्यानंतर आता भारत हाँगकाँगविरुद्ध सामना खेळण्यासाठी उद्या बुधवारी मैदानात उतरणार आहे. आशिया कप २०२२ स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना आहे. विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमधील भारताचा हा अखेरचा सामना असून हा जिंकल्यास भारत पुढील फेरीत पोहोचणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

३१ ऑगस्ट रोजी भारत आणि हाँगकाँग यांच्यातील आशिया चषकातील सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सामना सामना सुरु होईल. हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे. भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अ‍ॅपवरही सामना पाहता येणार आहे.

भारत आणि हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निझाकत खान म्हणाला की, आम्ही भारताविरुद्ध २०१८ आशिया चषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळलो होतो. आम्ही तो सामना फक्त २० धावांनी गमावला. टी-२० सामन्यात काहीही होऊ शकते. कोणत्या षटकात गोलंदाज कधी चांगली गोलंदाजी करेल किंवा फलंदाज कधी स्फोटक धावा काढेल हे तुम्हाला माहीत नाही. आघाडीचे संघ कसे पराभूत झाले हे देखील आपण यापूर्वी पाहिले आहे. आम्ही सकारात्मक माइंडसेटने मैदानात जाणार आहोत. दरम्यान खानच्या या वक्तव्यावरुन भारत विरुद्ध हाँगकाँग सामना चुरशीचा होऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या