26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआर्थिकदृष्ट्या भारत वाईट स्थितीत

आर्थिकदृष्ट्या भारत वाईट स्थितीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई आणि रुपयाची घसरण, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आर्थिकदृष्ट्या भारत सध्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. हे असेच सुरू राहिले तर पुढे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे भारतीयांना गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधींनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत रुपया नीचांकी पातळीवर घसरला आहे, आणि मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १०० रुपयांनी आणि एलपीजीच्या किमती १००० रुपयांपेक्षा अधिक वाढवण्याचे आपले लक्ष पूर्ण केले, अशी टीका केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर देशाची आर्थिक स्थिती लोकांपासून लपवल्याचा आरोप केला आहे.
परिस्थिती सुधारण्यावर लक्ष द्या

आर्थिक आघाडीवर देशाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला आहे. पंतप्रधानांना आपली पीआर ऑफर इकडे-तिकडे देण्याऐवजी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घ्यावी आणि ती सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी, असे म्हटले आहे.

धोरण लकवामुळे रुपयाची घसरण : सुरजेवाला
सरकारचा धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळेच रुपया आयसीयूमध्ये गेल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी केला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.४१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ७५ वर्षांनंतर प्रथमच रुपया आयसीयूमध्ये आहे. देश याचे उत्तर मागत आहे असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या