नवी दिल्ली : भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ बनला आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर कामगिरी करणारा भारतीय संघ जगातील दुसरा संघ ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रॅकिंगमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून कसोटी फॉरमॅटमध्ये प्रथमस्थान पटकावले आहे.
भारतीय संघ वनडे आणि टी-२० मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या कसोटीत भारताचे ११५ गुण झाले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया १११ गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे.
टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका २-०किंवा त्याहून अधिक फरकाने जिंकावी लागेल. भारताने नागपुरात ज्या प्रकाराच खेळ दाखवला आहे. त्यात हे काम विशेष अवघड वाटणार नाही. आता या दोघांमधील दुसरी कसोटी दिल्लीत खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियापेक्षा २ पॉईंट्सने पुढे
वनडे क्रमवारीतही भारत ऑस्ट्रेलिया संघापेक्षा २ गुणांनी पुढे आहे. भारताचे ११४ गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे ११२ गुण आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर भारत १७ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडचे गुण समान आहेत. पण न्यूझीलंडने २९ आणि इंग्लंडने ३३ सामने खेळले आहेत. यामुळे न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे.