26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

एकमत ऑनलाईन

मोठी झेप, ब्रिटनला टाकले मागे
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत टॉप ५ अर्थव्यवस्थेत सामील झाला आहे. इतकेच नाही तर भारताने सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला मागे टाकले आहे. ब्रिटन आता सहाव्या स्थानावर घसरला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गणनेत २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत भारताने इंग्लंडला मागे टाकले. दुसरीकडे आयएमएफच्या जीडीपी डेटानुसार भारताने २०२२ च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली. या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.

मार्च तिमाहीच्या अखेरीस आयएमएफ आणि डॉलर विनिमय दराने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने माहिती दिली की नाममात्र रोखीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८५४.७ अब्ज डॉलर होता, तर याच कालावधीत त्याच आधारावर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८१६ अब्ज डॉलर होता. तसेच आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आपली धार मजबूत करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, एकीकडे चालू आर्थिक वर्षात भारतासाठी विकासाचा अंदाज ७ टक्के ठेवण्यात आला आहे, जी जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पाहता भारत वार्षिक आधारावर डॉलरच्या मूल्यामध्ये इंग्लंडला मागे टाकून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.

२० वर्षात १० पटीने जीडीपीत वाढ
वार्षिक आधारावर भारताची अर्थव्यवस्था ३१.७ ट्रिलियन डॉलरची आहे आणि इंग्लंडच्या मागे सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जीडीपी सध्या ३.१९ ट्रिलियन डॉलर आहे, तर ७ टक्क्यांच्या अंदाजे वाढीसह भारत या वर्षीही वार्षिक आधारावर यूकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताच्या जीडीपीने गेल्या २० वर्षांत १० पट वाढ नोंदवली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या