24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआजपासून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा

आजपासून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा

एकमत ऑनलाईन

महागाई, बेरोजगारीविरोधात रान उठविणार
नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे दिल्लीतील सत्ताधीशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ पासून सुरू होणार आहे.

बारा राज्यांतून जाणारी ३ हजार ५७० किलोमीटर लांबीची ही भारत जोडो पदयात्रा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे ११८ सहकारी पुढच्या ६ महिन्यांत पूर्ण करणार आहेत. आजच्या विशेष पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रे च्या तीन मिनिटांच्या गीताच्या व्हीडीओचे अनावरण केले. एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाये तो जुड जाये अपना वतन अशा ओळी असलेल्या या गीताच्या पहिल्या दोन ओळींमध्ये भारत जोडो यात्रे मागची भूमिका, उद्देश आणि विचाराचा सारांश आहे. तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांसह या गीताचे संबंधित राज्यामध्ये यात्रेचा प्रवेश होईल, तेव्हा स्थानिक भाषेत अनावरण केले जाईल.

ही तर जनतेची चिंता
भारत जोडो यात्रा ही कोणत्याही प्रकारे मन की बात नाही. भारत जोडो यात्रा ही जनतेची चिंता आहे. जनतेचे प्रश्न आणि मागण्या दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेत टेलिप्रॉम्प्टरच्या साह्याने केलेली भाषणे किंवा दीर्घ प्रवचने आणि नाटकबाजी होणार नाही. या यात्रेचा लोकसभा वा विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले.

 

 

… असा असेल कार्यक्रम

-कन्याकुमारीहून या यात्रेचे थेट प्रसारण ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजतापासून सुरू होणार

-यात्रा रस्त्यावर असताना, राहुल गांधी यांच्या स्थानिक नागरिक, विविध नागरी संस्था, महिला, शेतकरी, मच्छिमार, प्रमुख नागरिक यांच्याशी संवाद किंवा विशेष कार्यक्रम होईल

– संकेतस्थळांच्या माध्यमातून या भेटी-कार्यक्रमांचे थेट प्रसारण

– सकाळी ७ ते १०.३० आणि दुपारी ३.३० ते ६.३० दरम्यान ७ सप्टेंबरपासून पुढचे किमान १५० दिवस सोशल मीडियावर हे थेट प्रसारण होत राहील

– मोबाइलवर हे प्रसारण उपलब्ध असेल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या