30.8 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeक्रीडा१२ फेब्रुवारीला भारत-पाक महामुकाबला

१२ फेब्रुवारीला भारत-पाक महामुकाबला

एकमत ऑनलाईन

केपटाऊन : महिला टी २० विश्वचषक शुक्रवार दि. १० फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका पहिल्या सामन्यात आमनेसामने असतील. दरम्यान या विश्वचषकात भारतीय संघ १२ फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दिवशी भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही ५ संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना १२ फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्रे+ हॉटस्टार अ‍ॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारत-पाकचा हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान महिला संघात आतापर्यंत १३टी-२० सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व राखलं आहे. यावेळी भारताने 10 सामने ंिजकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ 3 सामने ंिजकले आहेत.

कसा आहे भारतीय संघ?
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड .

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या