22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाभारत-पाकिस्तानचा रविवारी महामुकाबला

भारत-पाकिस्तानचा रविवारी महामुकाबला

एकमत ऑनलाईन

आशिया कप शनिवारपासून दुबईत सुरू
दुबई : आशिया खंडातील देशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा असणारी आशिया कप-२०२२ शनिवार, दि. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. २८ ऑगस्ट रोजी दुबईच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघानी आपापल्या नव्या जर्सीचे अनावरण केले असून बीसीसीआय आणि पीसीबीने आपापल्या अधिकृत ट्वीटरवर खेळाडूंचे नव्या जर्सीतील व्हीडीओ पोस्ट केले आहेत.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया नव्या जर्सीत फोटोशूट सेशन करताना दिसत आहेत. या फोटो सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक असे सारेच जण मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

पाकिस्तानी खेळाडूंनीही केले फोटोशूट
आशिया कप २०२२ पूर्वी पाकिस्तान संघानेदेखील आपल्या नवी-कोरी जर्सीचे अनावरण करत दुबईत फोटोशूट केले आहे. या सर्वाचा व्हीडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्वीटरवर अपलोड केला आहे. या व्हीडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडूदेखील फोटोशूटदरम्यान मस्ती करताना आणि विविध गेम्स खेळताना दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या