25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाभारत-पाकमध्ये आज रंगणार महामुकाबला

भारत-पाकमध्ये आज रंगणार महामुकाबला

एकमत ऑनलाईन

आशिया कप, ब-याच वर्षांनंतर दोन संघ भिडणार असल्याने उत्सुकता
दुबई : आजपासून बहुप्रतिक्षित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून, पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये रंगला. परंतु सर्वांचे लक्ष भारत-पाक महामुकाबल्याकडे आहे. रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. ही नेहमीच हायहोल्टेज लढत असते. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या लढतीवर नजर असते. त्यामुळे पहिल्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे भारतीयांचे लक्ष असणार आहे.

या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी कसून सराव केला. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा उद्याच्या सामन्याकडे आहेत. यासंदर्भात बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, स्पर्धेत टॉस महत्वाचा ठरू शकतो. पाकिस्तानविरुद्धचा सामना म्हटले की नक्कीच दडपण असते. हा सामना सोपा नसतो. पण संघातील खेळाडू चांगलेच अनुभवी आहेत. आतापर्यंत त्यांनी ब-याचदा दडपण उत्तमरीत्या हाताळले आहे. त्यामुळे हा सामनाही आम्ही जिंकू, असे म्हटले.

आशिया चषकातील सामने टी-२० फॉम्यॉटमध्ये २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधित खेळवले जात आहेत. ही स्पर्धा ६ देशांदरम्यान खेळवली जाते. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून या स्पर्धेमधील कामगिरी सर्वच संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा टॉस हा सायंकाळी ७.०० वाजता पाहायला मिळू शकतो. त्यानंतर लढत पाहायला मिळणार आहे. अर्थात, हा सामना रात्री उशिरापर्यंत चालू शकतो. रात्री निवांत सर्वांना सामना पाहता येणार आहे.

पंड्याचा कसून सराव
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नेटमध्ये कसून सरावा केला. सराव करतानाचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स या नव्याको-या संघाचे नेतृत्व करत संघाला थेट जेतेपद मिळवून दिले होते. याच कारणामुळे त्याच्या आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीकडेही तेवढ्याच उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या