24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत - पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांचा आरोप

भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत – पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांचा आरोप

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यावरून असे दिसत आहे की, यापूर्वी भारताने जो सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याची भीती अजूनही त्यांची मनातून गेली नाही. शुक्रवारी दुबईत पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी असा दावा केला आहे पाकिस्तानकडे भारताच्या पुढील सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आहेत.

याबाबत बोलताना कुरेशी यांनी सांगितले, मला गुप्तचर सूत्रांकडून समजले आहे की, भारत पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राईकचा प्लॅन तयार करत आहे. ही एक गंभीर बाब आहे. मला याचीही माहिती आहे की, भारताने यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या सहका-यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारत त्यांना भागिदारही मानतो. भारतात वाढत असलेल्या अंतर्गत मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारचा प्लॅन आखला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शांतता सामूहिक जबाबदारी : कुरेशी
कुरेशी म्हणाले की, आम्ही जगाला सांगू इच्छितो की, शांतता ही सामूहिक जबाबदारी आहे. भारत त्यांच्या देशातील अंतर्गत मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला स्थिर करण्यासाठी हालचाल करत आहे. आमची विनंती आहे की, जगाने त्यांना तसे करण्यापासून रोखावे. दरम्यान पाकने अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पाकमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्युटने अशा प्रकारचे वृत्त दिले होते़

अमेरिकेत मॉर्डना लस उपलब्ध; लसीला देण्यात आली मंजुरी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या