25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडाहॉकीत भारत - ऑस्ट्रेलिया अंतिम लढत

हॉकीत भारत – ऑस्ट्रेलिया अंतिम लढत

एकमत ऑनलाईन

मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद बाहेर
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल खेळणार आहे. मात्र या मॅच आधी भारतीय संघाला एक झटका बसला आहे. टीमचा मुख्य खेळाडू फायनल आधी बाहेर गेला आहे. भारतीय टीमचा स्टार खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळणार नाही. या महत्त्वाच्या सामन्याआधी त्याला दुखापत झाली आहे. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इतिहास रचण्याची संधी
भारतीय हॉकी टीमकडे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय हॉकी संघ कधीच कॉमनवेल्थ मध्ये कधीच गोल्ड मेडल जिंकू शकलेला नाही. हॉकी संघाला फक्त दोन रौप्यपदक मिळवता आली आहेत. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता.

सुवर्ण जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न
भारतीय पुरुष हॉकी संघ २०१० आणि २०१४ मध्ये कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचला होता. दोन्हीवेळा ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केलं. यावेळी सुद्धा भारतासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. यावेळी गोल्ड मेडल जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या