भारत आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक करेल-इम्रान खान

    498

    अंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या काही दिवसांपासून भारताकडून भीती वाटत असल्याचे वक्तव्य करत आहेत. तर भारत आमच्यावर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती इम्रान खान हे इतर देशांना सांगत आहे. तर इम्रान यांनी रविवारी इस्लामाबादमधील काश्मीरमध्ये दहशतवादाचे समर्थन करत पाकविरुद्ध ‘छळ मोहीम राबविण्याची’ संधी निर्माण केली जात असल्याचा आरोप भारतावर केला आहे.

    याबाबत इम्रान खान यांनी ट्विट केले आहे, भारत सरकार काश्मिरींना आत्मनिर्णयनाच्या हक्कापासून दूर ठेवू इच्छित आहे. भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मिरींना मिळालेल्या आत्मनिर्णयनाच्या अधिकारासाठी संघर्षाला पाक समर्थित दहशतवादाच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पाकिस्तानविरुद्ध ‘छळ मोहीम’ राबवण्याची संधी मिळेल आणि जगाचे लक्ष काश्मीरमधून वळवले जाईल, असे इम्रान खान यांनी म्हंटले आहे.

    दरम्यान भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान दहशतवादाला खत पाणी घालत असल्याचा आरोप केला होता. तर जनरल नरवणे यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, ‘मी हे सांगू इच्छित आहे की युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या प्रत्येक कृतीत आणि दहशतवादाला (पाकिस्तानच्या) पाठिंबा दिल्याबद्दल भारत योग्य प्रतिसाद देईल. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे.