21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाआशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. तर यंदाच्या आशिया कप २०२२ साठीचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंजळ अर्थात बीसीसीआयने स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे.

विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली असून संपूर्ण भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

असा असणार भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या