24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाझिम्बाब्वे दौ-यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुल

झिम्बाब्वे दौ-यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुल

एकमत ऑनलाईन

बेंगळूरू : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झालाय. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ३० जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. त्यामध्ये केएल राहुलचे नाव नव्हते. तीन एकदिवसीय सामन्यासाठी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, १० दिवसांत शिखर धवनच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनचे चाहते नाराज झाल्याची चर्चा आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात शिखर धवनला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बीसीसीआयने ट्विट करत राहुल फिट असून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमध्ये राहुलला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या