26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडाभारतीय फुटबॉल संघ फिफासाठी पात्र

भारतीय फुटबॉल संघ फिफासाठी पात्र

एकमत ऑनलाईन

भारताने रचला इतिहास
नवी दिल्ली : क्रिकेटवेड्या देशात अलीकडे फुटबॉल खेळही प्रसिद्धी मिळवत आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या दमदार खेळाने तर मागील काही काळात संघाचा खेळ आणखी सुधारला आहे. आता भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप २०२२ या भव्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवत इतिहास रचला. इतिहासात पहिल्यांदाच भारत या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये खेळणार आहे.

ही स्पर्धा पुढील महिन्यात २७ ते ३० जुलै या दिवसांत डेन्मार्क शहराच्या कोपेनहेगनमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने प्लेऑफमध्ये कोरिया आणि मलेशिया या संघाना मात देत पात्रता मिळवली आहे. फिफा नेशन्स कप च्या यंदाच्या सीजनमध्ये भारत आशिया/ओशिनिया क्षेत्रात होता. भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिलं गेले होते. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती. प्ले-इनच्या दरम्यान भारताने ३२ सामने खेळले, ज्यातील १२ सामने जिंकत ११ मध्ये भारत पराभूत झाला, तर ९ सामने अनिर्णीत ठरले. संपूर्ण ४ साने भारताने डिविजन १ मध्ये स्थान कायम ठेवले. ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रँकिंगमध्ये १९ व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशिया सारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.

२०२१ मध्ये पात्रतेपासून
थोडक्यात हुकला भारत
भारतीय फुटबॉल संघाची या स्पर्धेसाठीची यात्रा जानेवारी २०२१ मध्ये सुरु झाली. त्यावेळी एआयएफएफने फिफा नेशन्स सीरीज २०२१ साठी फिफासोबत भागीदारी केली. भारत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ६० देशांमध्ये होता. मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्रात भारताला ठेवण्यात आले होते. भारत त्याच्या क्षेत्रात तिस-या स्थानावर होता. केवळ एका स्थानाच्या फरकाने भार फिफा नेशन्स प्लेऑफ २०२१ मध्ये स्थान मिळवण्यारपासून हुकला. भारताने ते वर्ष २२ या वर्ल्ड रँंिकगवर संपवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या