37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeभारतीय रेल्वेनं तिकिट बुकिंगच्या नियमात केले मोठे बदल

भारतीय रेल्वेनं तिकिट बुकिंगच्या नियमात केले मोठे बदल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 12 मे पासून धावत असलेल्या 30 स्पेशल ट्रेन आणि 1 जून पासून सुरू होणार्‍या 200 ट्रेनच्या तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने या ट्रेनच्या तिकिट बुकिंगसाठी अगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता 120 दिवस अगोदर तिकिट बुक करता येईल.

यापूर्वी जारी केलेल्या निर्देशानुसार राजधानी विशेष ट्रेन आणि 200 मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी तिकिट बुकिंग 30 दिवस अगोदर होऊ शकते. मात्र, जेव्हा स्पेशल ट्रेन सुरू केल्या, तेव्हा अगाऊ आरक्षण कालावधी सात दिवसांचाच होता, जो नंतर वाढवून 30 दिवस करण्यात आला होता.

सोबतच भारतीय रेल्वेने या सर्व 230 ट्रेनमध्ये पार्सल आणि सामानाच्या बुकिंगची परवानगी दिली आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांचे संचालन हळुहळु सुरू करण्याच्या योजनेंतर्गत 12 मे रोजी 15 जोडी एसी ट्रेन सुरू केल्या होत्या. या स्पेशल ट्रेन नवी दिल्लीला डिब्रूगढ़, अगरतला, हावड़ा, पाटणा, बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीला कनेक्ट करतात.

Read More  स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण : पंकजा मुंडेंची भावनिक साद

याशिवाय रेल्वेने प्रवासी मजूरांसाठी श्रमिक स्पेशल आणि एसी स्पेशल ट्रेननंतर 1 जूनपासून 100 जोडी (अप-डाऊन) नॉन एसी स्पेशल ट्रेन चालवण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. या ट्रेनसाठी तिकिट बुकिंग 21 मेपासून सुरू झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या