18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय तरुणाईला ऑनलाईन गेमचे वेड!

भारतीय तरुणाईला ऑनलाईन गेमचे वेड!

एकमत ऑनलाईन

भारत जगात चौथा, भारतात १५०० कोटी वेळा गेम डाऊनलोड, २०२२ मध्ये ८९६७ कोटींचा व्यवसाय

नवी दिल्ली : भारतातील तरुणाई ऑनलाइन गेम्समध्ये मोठा रस घेत आहे. २०२२ मध्ये भारतात १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड केले. हे चीन आणि अमेरिकेनंतर जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. अमेरिका, चीन आणि जपाननंतर जगाला भारतात ऑनलाइन गेम्सची सर्वात जास्त शक्यता दिसते. याचे सर्वात मोठे कारण तरुण लोकसंख्या आणि स्वस्त मोबाइल डेटा आहे. गेमिंग कॅपिटल फंड लुमीकाईनुसार भारतात २०२२ मध्ये ऑनलाइन गेम्सचा व्यवसाय सुमारे ८९६७ कोटी रुपयांचा आहे.

भारतात दिवसेंदिवस तरुणाई ऑनलाईन गेममध्ये अडकत चालली असून, याच्या व्यवसायात भारत जगात चौथा देश ठरला आहे. यावरून ऑनलाईन गेमचे वेड किती वाढले आहे, याचा अंदाज येतो. धक्कादायक बाब म्हणजे फक्त २०२२ मध्ये भारतात तब्बल १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात रेवेनॅट इस्पोट्र््सचे संस्थापक रोहित जगासिया म्हणाले की, अ‍ॅप स्टोअरवरून चीनचे बॅटलग्राउंड गेम हटवण्याच्या भारत सरकारच्या आदेशानंतर उद्योगाला झटका बसला होता. मात्र, यामुळे आपली कमाई वाढली होती.

२९ वर्षीय सलमान अहमदने गेमर होण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. गेमर म्हणून तो दरमहा सुमारे १० लाख रु. कमावतो. त्याने चिनी मोबाइल कंपनी रेडमीपासून स्किन केअर कंपनी मामाअर्थपर्यंतच्या ब्रँडशी करार केले आहेत.२३ वर्षीय सलोनी पवार ही भारतातील पहिली महिला आहे, जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एखाद्या ई-स्पोर्टस स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा २०१९ मध्ये थायलंडमध्ये झाली होती. ती म्हणते की, प्रथम कुटुंबाने साथ दिली नव्हती. मात्र, पैसे येत गेल्यावर त्यांना लक्षात आले की, यातही संधी आहे. हैदराबादमध्ये १८ ते २० नोव्हेंबरपर्यंत ८० लाखांच्या बक्षिसांच्या ३ ई-स्पोर्टस स्पर्धा मोबाइलद्वारे हजारोंनी पाहिली.

देशात २०२६ पर्यंत
१०० कोटी स्मार्टफोन
सध्या ९२ कोटी पबजी निर्मात्या कोरियन कंपनीचे भारतातील सीईओ सियान ुनिल सॉन म्हणाले की, ५ जीचा शुभारंभ भारताच्या ऑनलाइन गेमिंगला मोठा बाजार देईल. डेलोइटेनुसार २०२६ पर्यंत भारतात १०० कोटी स्मार्टफोन असतील. अमेरिकी कंपनी मोगोचे रिचर्ड व्हेलन यांनी आम्ही भारतात सर्वात मोठे विद्यापीठ ई-स्पोर्टस स्पर्धा घेतो. त्यात ४०० पेक्षा जास्त संघ सहभागी होतात, असे म्हटले.

ऑनलाईन गेम कमाईचे साधन
गुंतवणूकदार भारतात ऑनलाइन गेमिंगमध्ये बरीच गुंतवणूक करू इच्छितात. ऑनलाइन गेम करमणूक नव्हे तर कमाईचे साधन बनले आहे. गेम बनवण्यापासून खेळण्यापर्यंत पैसे मिळत आहेत. ई-स्पोर्टसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये बक्षिसांची रक्कम मिळत असते, असे लुमीकाईच्या संस्थापक सलोनी सेहगल यांनी सांगितले.

५ जीनंतर ऑनलाईन गेमचा
व्यवहार ३० हजार कोटींवर!
५ जी लाँचिंगनंतर मार्च २०२७ पर्यंत हा ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. नॉडविन गेमिंगचे व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले की, भारतात मध्यमवर्ग वाढत आहे. यामुळे ऑनलाइन गेमिंगचा बाजारही वाढेल. त्यामुळे भविष्यात तरुणाई आणि मुलेदेखील या ऑनलाईन गेमिंगमध्ये आणखी जखडून जाण्याचा धोका आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या