37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeउद्योगजगतजगात सर्वाधिक २१,७३३ टन सोने भारतीयांकडे!

जगात सर्वाधिक २१,७३३ टन सोने भारतीयांकडे!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत हा जगातील श्रीमंत देशापैकी एक आहे, असे जर कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहे, असे म्हणता येणार आहे. कारण जगात सर्वाधिक सोने भारतीयांकडे आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारतीयांकडे तब्बल २१,७३३ टन सोने आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीयांना सोन्याचे किती आकर्षण आहे, याचा अंदाज येतो.

जागतिक बाजारपेठेत सोने बाजारपेठ आणि व्यवसाय यांच्यासाठी वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ही संस्था एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेने काही वर्षातील सोने बाजारपेठचा अभ्यास करून त्याचा नुकताच अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतीयांकडे जगातील एक टक्के सोने आहे. त्यात आकडेवारीचा विचार केल्यास भारतात तब्बल २१,७३३ टन सोने आहे. भारत जरी गरीब किंवा विकसनशील देश मानला जात असला तरी भारतीयांकडे असणा-या सोन्याचा विचार करता भारत जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे. कारण जगात कोणत्याच देशांकडे भारताएवढे सोने नाही. त्यामुळे भारतीय सोन्याच्या दागिन्यांमध्ये किती गुंतले आहेत, हे स्पष्ट होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणत भारतात सोने असल्याची अनेक कारणे आहेत. भारतात विविध सण, परंपरा आणि लग्न समारंभात सोन्याचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे सातत्याने अनेकजण विविध कारणांनी सोन्याची दागिने खरेदी करत असतात. त्याशिवाय सोन्याचे दागिने खरेदी करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्यामुळेच सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा नेहमीच कल राहिला आहे. त्यात समाजातील सर्वच स्तरांमध्ये सोने खरेदीकडे ओढा असल्याचे दिसून येते.

सोन्याचे आकर्षण कायम
मागच्या तुलनेत भारतीयांची रहन, सहन, खरेदी व्यवहारात बराच बदला झाला आहे. मात्र, सोन्याचे आकर्षण काही कमी झाले नाही, तर उलट सोने खरेदीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे आता तर सोन्याचा दर ५० हजारांच्या पुढे गेला आहे, तरीदेखील खरेदी कमी नाही. या कारणामुळेच भारतीय महिलांजवळ हजारो कोटी रुपयांच्या सोन्याची साठवणूक झाली असल्याचे दिसून येते.

७ देशांच्या आकडेवारीपेक्षा
भारतातील सोने अधिकच
सोन्याच्या साठ्यात देशभरात वाढ होत राहिल्याने भारत जगातील सात प्रगत देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही पुढे असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे. अमेरिका (८१३३), जर्मनी (३३८२), इटली (२४५१), फ्रान्स (२४३६), रशिया (२२९८), चीन (१९४८) सिंगापूर (१२७) टन इतका सोन्याचा साठा या सातदेशांजवळ आहे. या सातही देशांच्या सोन्याच्या साठ्याची आकडेवारी एकत्र केली तरी भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती कमीच आहे.

भारतावरील कर्जाच्या
रकमेपेक्षा अधिक सोने
भारतावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात खर्चही वाढत आहे. यातून भारतीयांचा दरडोई कर्जाचा बोजा वाढत आहे, असेही असले, तरी भारतात असलेल्या सोन्याच्या किमतीचा विचार केला, तर भारतावर जेवढा कर्जाचा बोजा आहे, त्या कर्जाच्या रकमेपेक्षाही सोन्यातून अधिक रक्कम मिळू शकते, एवढे देशात सोने आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या