24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाभारताचे पाकसमोर १८२ धावांचे आव्हान

भारताचे पाकसमोर १८२ धावांचे आव्हान

एकमत ऑनलाईन

दुबई : आशिया कप सुपर ४ च्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने धडाकेबाज सुरूवात करून देत आपले इरादे स्पष्ट केले. दरम्यान भारताने आज ७ गडी गमावून १८१ धावा ठोकल्या तर पाकिस्तान १८२ धावांचे लक्ष्य ठेवले.

रोहित आणि राहुलने पहिल्या ५ षटकांत ५३ धावांपर्यंत मजल मारून देत पॉवर प्लेमध्ये १० ची सरासरी राखली. मात्र त्यानंतर हारिस रौऊफने रोहितला २८ तर शादाब खानने केएल राहुलला २८ धावांवर बाद करत भारताला दोन धक्के दिले. गेल्या सामन्यातील स्टार सूर्यकुमार यादव देखील १३ धावांची भर घालून परतला. त्यामुळे १० षटकानंतर भारताची धावगती थोडी मंदावली.

मात्र विराट कोहली तोपर्यंत सेट झाला होता. त्याच्या जोडीला आलेल्या ऋषभ पंतने देखील चांगली साथ देत भारताचा धावगती पुन्हा वाढवली. दरम्यान, ऋषभ पंतने शादाबला रिव्हर्स स्विंग मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला. तो १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील शुन्य धावा करून माघारी परतला. त्याला मोहम्मद हुसनैनने बाद केले.

पंत-पांड्या बाद झाल्यानंतर विराट कोहलीने दीपक हुड्डाला साथीला घेत भारताचे दीडशतक धावफलकावर लावले. त्याने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान शेवटची दोन षटके राहिली असताना दीपक हुड्डा १४ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. अखेर विराट कोहली २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ४४ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. विराटनंतर आलेल्या रवी बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताला २० षटकांत १८१ धावांपर्यंत पोहचवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या