22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडाभारताचे बांगलादेशसमोर १८५ धावांचे आव्हान

भारताचे बांगलादेशसमोर १८५ धावांचे आव्हान

एकमत ऑनलाईन

अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १८४ धावा केल्या आहेत. विराट आणि राहुलने अर्धशतक ठोकल्यामुळे भारताने ही धावसंख्या उभारली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

कारण याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला मात दिली असून बांगलादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोघांना प्रत्येकी एक सामना गमवावाही लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर १२ मधील चौथा सामना आज खेळणार आहेत. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघांना आजचा सामना महत्त्वाचा आहे.

  • विराट ठरला टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
    भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सर्वांत प्रथम पाकिस्तान आणि त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतकीय खेळी करणा-या विराटने त्याची उत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना का केली जाते? हे दाखवून दिले.

बांगलादेशविरुद्ध अ‍ॅडलेड येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषकातील भारताच्या चौथ्या सामन्यात विराटने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.. विराटने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेच्या डोक्यावरचा ताज हिसकावून टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

  • महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडलाला
    विराट कोहली त्याच्या टी-२० कारकीर्दीतील पाचवा टी-२० विश्वचषक खेळत आहे. टी-२० विश्वचषकातील अवघ्या २३ इनिंगमध्ये त्याने १००० धावांचा टप्पा गाठला. याशिवाय, त्याने महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला आहे. टी-२० विश्वचषकातील इतिहासात महेला जयवर्धनेने ३१ डावांत १ हजार १६ धावा केल्या होत्या.

या दरम्यान, विराटच्या बॅटमधून १२ अर्धशतके झळकली आहेत. विराटने २०१२ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक खेळला. ज्यात त्याने १८५ धावा केल्या. त्यानंतर २०१४ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. टी-२० विश्वचषकात दोन वेळा सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूचा खिताब जिंकणारा विराट एकमेव खेळाडू ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या