24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयभारताचा पर्यावरण निर्देशांक घसरला  

भारताचा पर्यावरण निर्देशांक घसरला  

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरातील १८० देशांचा २०२२ या वर्षासाठीचा पर्यावरण कामगिरी निर्देशांक अमेरिकेतील संस्थांनी जाहीर केला असून या यादीत भारत तळाला आहे. डेन्मार्कने सर्वोत्तम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ब्रिटन, फिनलंड अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर आहेत.

अमेरिकेतील येल येथील पर्यावरण कायदा आणि धोरणासाठीचे केंद्र, आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान माहिती नेटवर्क केंद्र आणि कोलंबिया विद्यापीठाने ही यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत भारत निचांकी १८.९ गुण मिळवत सर्वांत शेवटच्या म्हणजे १८० व्या क्रमांकावर आहे.

भारतात हवेचा दर्जा धोकादायक बनत असून वेगाने वाढणा-या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे देश पहिल्यांदाच यादीत शेवटचा क्रमांकावर गेला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीन २८.४ गुणांसह १६१ व्या क्रमांकावर आहे. भारत व चीन हे दोन्ही देश २०५० पर्यंत सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करणारे देश बनतील, असा अंदाजही अहवालात वर्तविण्यात आला आहे.

या यादीत अमेरिका ४३ व्या क्रमांकावर असून पाश्चिमात्य देशांतील २२ श्रीमंत देशांत अमेरिका २० व्या क्रमांकावर आहे. केवळ डेन्मार्क, ब्रिटन हेच देश २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतील. याऊलट पर्यावरण क्षेत्रात इतर अनेक देशांचा प्रवास चुकीच्या दिशेने होत असून चीन, भारत, रशिया या प्रमुख देशांत हरितगृह वायू उत्सर्जन वेगाने वाढत आहे.

सध्याचीच परिस्थिती यापुढेही राहिली तर २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात चीन, भारत, अमेरिका आणि रशिया याच चार देशांचा वाटा निम्मा असेल, असेही अहवालात म्हटले आहे.

असा काढला निर्देशांक…
पर्यावरणविषयक महत्त्वाच्या ११ श्रेणींतील कामगिरीविषयक ४० सूचकांचा वापर करत प्रत्येक देशांचा असा निर्देशांक काढण्यात आला. त्याचप्रमाणे, हवामान बदल कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि परिसंस्थेचाही आधार घेण्यात आला. हे निर्देशांक संबंधित देश आपल्या पर्यावरण धोरण लक्ष््याच्या किती जवळ आहेत, याविषयी माहिती देतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या