27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडाभारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर विवाहबंधनात

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर विवाहबंधनात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जून रोजी लग्नगाठ बांधली. दीपक प्रेयसी जया भारद्वाजसोबत लग्नबांधनात अडकला. आग्रा येथील ‘जेपी पॅलेस’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

दीपकने जयाला स्टेडियममध्ये प्रेक्षकांसमोरच प्रपोज केले होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दीपक चहरने खुलेपणाने चाहत्यांमध्ये आपले प्रेम व्यक्त केले होते.

जया अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ ‘बिग बॉस’ आणि एमटीव्ही शो ‘स्प्लिट व्हिला’ मध्ये झळकला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून दीपक-जयाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

दिल्लीची रहिवासी असलेली जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीशी संबंधित आहेत. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. दीपक-जयावर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या