20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeतंत्रज्ञानइथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच

इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे जनतेच्या खिशावर बोजा वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणायच्या विचारात आहे. त्यामुळे आज लाँच झालेल्या कारकडे महागड्या पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

टोयोटाने ही कार भारतात फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स म्हणून पायलट प्रोजेक्ट अंतर्गत लॉन्च केली आहे. इथेनॉलवर चालणा-या गाडया किफायतशीर आणि परवडणा-या तर असतीलच शिवाय वायू प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही टळण्यास मदत होणार आहे. उसापासून इथेनॉल तयार होते. भारताचा ऊस उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो. देशात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार इथेनॉलवर भर देत आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने इथेनॉलची मागणी वाढेल आणि ऊस उत्पादक शेतक-यांचे उत्पन्नही वाढू शकेल असा मानस सरकारचा आहे.

अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे उद्दिष्ट
गेल्या वर्षी जूनमध्ये गडकरींनी देशात फ्लेक्स-इंधन वाहने अनिवार्य करण्याबाबत भाष्य केले होते. यामुळे शेतक-यांना मदत होण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे ते म्हणाले होते. गडकरींच्या मते भारतातील ३५ टक्के प्रदूषण हे जीवाश्म इंधनावर चालणा-या वाहनांमुळे होते. त्यामुळे इथेनॉलसारखे पर्यायी इंधन विकसित केले पाहिजे जे स्वदेशी, किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या