नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर उद्घाटन सोहळ््यात भारताची ध्वजधारक म्हणून पीव्ही सिंधूची निवड झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएसनने आज हा वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ही माहिती दिली.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक म्हणून निवडल्याची घोषणा करताना आनंद होत आहे, असे सांगण्यात आले. नीरज चोप्राने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहैन यांचा ध्वजधारक म्हणून विचार झाला होता. आयओएच्या अधिकृत वक्तव्यानुसार सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ आणि टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकले होते. तिच्यासोबतच मीराबाई चानू आणि लोव्हलिना बोरगोहैन यांनीदेखील ऑलिम्पिक पदक ंिजकल्याने त्यांचाही विचार होणे गरजेचे होते.