22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाबॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पदक निश्चित

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पदक निश्चित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी चिराग शेट्टीने इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा २४-२२, १५-२१, २१-१४ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तसेच बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारून देशासाठी पदक निश्चित करणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली आहे.

या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये भारतीय पुरूष दुहेरी जोडीने २४-२२ असा विजय मिळवला. त्यानंतर दुस-या सेटमध्ये भारताचा २१-१५ असा पराभव करत जपानने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर निर्णायक आणि तिस-या सेटमध्ये सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने आक्रमक खेळी केली. या सेटमध्ये भारताने जपानचा २१-१४ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या जोडीने २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले पदक निश्चित केले आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे एकूण १३ वे पदक आहे. त्याचबरोबर दुहेरीच्या सामन्यात भारताला याआधी एक पदक जिंकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या