24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयभारताची ५जी आणि ६जीकडे वाटचाल : पंतप्रधान मोदी

भारताची ५जी आणि ६जीकडे वाटचाल : पंतप्रधान मोदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला संबोधित केले. मोदींनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील एकूण आठ संस्थांद्वारे बहुसंस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेला ५जी टेस्टबेड देखील लॉन्च केला.
मोदींनी ट्रायला रौप्यमहोत्सवी शुभेच्छा दिल्या. आज तुमच्या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली हा आनंददायी योगायोग आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात पुढील २५ वर्षांच्या रोडमॅपवर देश काम करत आहे. मला स्वदेशी ५जी टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली. दूरसंचार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मोदी म्हणाले.
रोजगाराच्या संधी वाढतील – मोदी
देशाचे स्वत:चे ५जी मानक बनवले ही देशासाठी खूप अभिमानाची बाब आहे. देशातील खेड्यापाड्यांत ५जी तंत्रज्ञान पोहोचवण्यात हे मोठी भूमिका बजावेल. ५जी तंत्रज्ञान देशवासियांच्या जीवनातील सुलभता, व्यवसाय करण्याची सुलभता यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. त्यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत, असेही मोदी म्हणाले.

५जी भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देईल
५जी तंत्रज्ञान येत्या दीड दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेत ४५० अब्ज डॉलरचे योगदान देईल, असा अंदाज आहे. फक्त इंटरनेट नव्हे तर विकास आणि रोजगाराचा वेग देखील वाढणार आहे. असेच ५जी तंत्रज्ञान आणखी विकसित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या दशकाच्या अखेरीस आपल्याला ६जी सेवा सुरू करता येईल का? त्यादृष्टीने आपली टास्क फोर्स काम करत आहे. आमचे स्टार्टअप्स जलद तयार करण्याचा आणि दूरसंचार क्षेत्रात आणि ५जी तंत्रज्ञानामध्ये जागतिक चॅम्पियन बनण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही मोदींनी सांगितले.

लाखो खेड्यांमध्ये इंटरनेट पोहोचले
२०१४ पूर्वी भारतातील १०० ग्रामपंचायती देखील ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटीने जोडलेल्या नव्हत्या. आज आम्ही सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणली आहे. सरकारने नक्षलग्रस्त देशातील अनेक आदिवासी जिल्ह्यांमध्ये ४ जी सुविधा देण्यासाठी मोठी सुरुवात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या