21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाभारताच्या सुधीरची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

भारताच्या सुधीरची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या सुधीरने दिव्यांग हेविव्हेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधीरने २०८ किलो वजन यशस्वीरित्या उचलले.

त्यानंतर दुस-या प्रयत्नात रेकॉर्डब्रेक कामगिरी करत २१२ किलो वजन उचलून सुधीरने सुवर्णपदकाला गवसणी घातली. १३४.५ गुणांसह सुधीरने हा विक्रम रचला. या सुवर्णकामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सुधीरने यापूर्वी जागतिक दिव्यांग पॉवरलिफ्टिंग आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत २१४ किलो वजन उचलून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. यावर्षी जूनमध्ये दक्षिण कोरियात ही स्पर्धा पार पडली. २०१३ सालापासून सोनिपतमध्ये कारकिर्दीची सुरवात करणा-या सुधीरने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चीनच्या हांगझोऊमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ साठी सुधीरने पात्रता फेरी पार केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा आता २०२३ मध्ये होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या