24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताचा फ्रान्सला पाठिंबा ; मुस्लिम राष्ट्रांमध्ये फ्रान्सविरोधात असंतोष

भारताचा फ्रान्सला पाठिंबा ; मुस्लिम राष्ट्रांमध्ये फ्रान्सविरोधात असंतोष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताने निषेध केला आहे. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतली आहे, त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थन केले आहे. मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला, त्याचाही परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणासाठी दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, असेही भारताने पत्रकात म्हटले आहे. दरम्यान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यावरुन मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहेत.

‘राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर ज्या भाषेमध्ये व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले करण्यात येत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. काही आंतरराष्ट्रीय मानक आहेत, त्याचे हे उल्लंघन आहे. फ्रेंच शिक्षकावर ज्या क्रूर पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्यात आला, त्याचाही आम्ही निषेध करतो. संपूर्ण जगाला या घटनेने हादरवून सोडले. फ्रान्सची जनता आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबीयाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या या घोषणेनंतर भारतातील फ्रान्सच्या राजदूतांनी भारताचे आभार मानले आहेत. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र लढा देतील असे म्हटले आहे.

केरळमध्ये फळे, भाजीपाल्यांना एमएसपी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या