33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला भारताचा सहारा

श्रीलंकेच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला भारताचा सहारा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील काही भागातील लोकांना अक्षरश: खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्याासाठीही पैसे नसल्याच्या बातम्या श्रीलंकेतून समोर येत होत्या. त्यानंतर भारताने श्रीलंकेला मदत म्हणून ९० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा केली. श्रीलंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विजेवर्धने यांनी भारताच्या या भूमिकेचे कौतुक केले असून, भारताच्या या आर्थिक मदतीमुळे श्रीलंकेचे बुडणारे जहाज सध्यातरी वाचले आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत इशाराही दिला.

श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा जवळपास संपला आहे आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात महागाईने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने गुरुवारी श्रीलंकेला ९० दशलक्ष डॉलर्स कर्ज देण्याची घोषणा केली. विजेवर्धने म्हणाले, भारताच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेमुळे सध्या आर्थिक संकट टळले आहे. यातील १५० दशलक्ष डॉलर्सच्या भारतीय क्रेडिट लाइनच्या मदतीने, श्रीलंका भारतातून त्या वस्तू आयात करेल ज्यांची देशात कमतरता आहे.

चीनच्या कर्जामुळे ओढावले संकट
चीनकडून कर्ज घेत देशाने आणखी मोठे संकट ओढावून घेतल्याचे दिसून येत आहे. कारण चीन हा देश मुत्सद्देगिरीने कमकुवत देशांना कर्ज देतो आणि त्यांना अडकवतो. त्यानंतर त्या देशावर स्वत:ची मते आणि धोरण लादण्याचा प्रयत्न करतो. कर्जाची परतफेड न केल्याच्या बदल्यात श्रीलंकेला हंबनटोटा बंदर १०० वर्षांच्या लीजवर चीनला द्यावे लागले आहे. तरीही श्रीलंकेला चिनचे फेडता आलेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या