34.2 C
Latur
Wednesday, May 31, 2023
Homeभारताचे जलतरणपटू उपान्त्य फेरीतूनच बाहेर

भारताचे जलतरणपटू उपान्त्य फेरीतूनच बाहेर

एकमत ऑनलाईन

आॅलिम्पिकला मुकणार, विदेशात सराव सुरू

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाच्या वतीने नुकतीच देशभरातील स्टेडियम आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्स खुले करण्याची घोषणा केली. यातून काही राज्यांनी यासाठी पुढाकार घेतला. मात्र, काही राज्यांमध्ये स्थानिक सरकारने अद्याप याबाबतचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युरोपात सध्या इव्हेंटच्या सरावाला सुरुवात झाली. यात जलतरणाचा समावेश आहे. युरोपात पूल खुले करण्याचीही परवानगी दिली आहे. भारतात मात्र गाईडलाईनच जाहीर केली. त्यामुळेच भारतातील खेळाडू अडचणीत सापडले आहेत. भारतीय जलतरणपटू सरावाअभावी व स्पर्धेच्या नियोजना अभावी सध्यातरी आॅलिम्पिकच्या बाहेर पडल्यासारखे भासत आहेत़ जो पर्यंत क्रीडाविभागाच्या जलतरणपटूंसाठी स्पष्ट नियामवली येत नाही तो पर्यंत पुढील स्पर्धेबद्दल काहीच कळणार नाही अशी खंत जलतरणपटू मांडत आहेत़

स्वीमिंग पूल संसर्गासाठी धोकादायक
प्रत्येक जण मास्क लावून पूलमध्ये सराव करू शकत नाही. तसेच एकाच वेळी सर्व जण सराव करतात. त्यामुळे याचा मोठा धोका आहे. अनेक देशांत स्वीमरला सरावासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, भारतात अद्याप हे झाले नाही. फेडरेशन यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
– अमीन, माजी भारतीय कोच

Read More  नांदेडकरांना बुधवारी कोरोनापासून दिलासा

एका लेनमध्ये एकच जलतरणपटू
शासनाने परिस्थिती लक्षात घेऊन आॅलिम्पिक कोटा मिळवलेल्या स्वीमरला सरावाची परवानगी द्यावी. आम्ही साईला एसओपी दिली आहे. त्यामुळे आता जूनमध्ये याला परवानगी मिळण्याची आशा आहे. पूलमध्ये दोन बीपीएम क्लोरीन मेंटेन ठेवली जावी. वेगवेगळ्या भागात सॅम्पलिंग व टेस्ंिटग करावी. एका लेनमध्ये एकच जलतरणपटू सराव करेल. याच्या बाजूला काही अंतरावर दुसराही सराव करू शकेल. स्वीमिंग करताना खेळाडू वेगवेगळ्या गटर एरियात स्प्रिंट करेल. म्हणजे बाधेचा धोका कमी होईल.
-डी. मोनल चोकसी,
भारतीय स्वीमिंग फेडरेशन

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या