मुंबई : वडोदरा ते मुंबई हे अंतर तब्बल ४१२ किलोमीटर इतके आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे ७ ते ८ तास लागतात मात्र हे अंतर दोन तास २० मिनिटात पार केल्याने मुंबईतील रुग्णाला जीवदान मिळाले आहे. दरम्यान ही सर्व प्रक्रिया इंडिगोने तीन तासांच्या आत पार पडली आहे. सोमवारी दोन्ही शहरांमध्ये वेगवेगळ्या विभागागांद्वारे ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यात आला होता.
इंडिगो एअरलाईन्सच्या टीमला वडोदरा ते मुंबई एका जिवंत हृदयाच्या ट्रान्सपोर्टची जबाबादारी सोपवली होती. ही जबाबदारी इंडिगोने यशस्वीरित्या पार करीत एका रुग्णाला जीवदान दिले आहे. एअरलाईन्सच्या टीमला तीन तासांच्या आत हे हृदय मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात पोहचवायचे होते. इंडिगोने हे हृदय दोन तास २० मिनिटाताच हृदय रुग्णालयात यशस्वीरित्या पोहचवले.
मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि एका रुग्णाला जीवदान मिळाले. त्यानंतर ग्लोबल रुग्णालयाने इंडिगोच्या टीमचे आभार मानले. दरम्यान सदर हृदय हे वडोद-याहून मुंबई येथे एका विमानाने नेण्यात आले आहे. दोन्ही शहरातील पोलिसांनी देखील ग्रीन कॉरीडॉरची व्यवस्था केली होती. दरम्यान हृदय वडोदरा येथे पोहोचवण्यासाठी भारतीय एअरपोर्ट अथोरेटीनेदेखील या कामात मोठे सहकार्य केले आहे.