28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयइंडोनेशियाही खरेदी करणार भारताचे ब्रम्होस

इंडोनेशियाही खरेदी करणार भारताचे ब्रम्होस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगात भारतीय शस्त्रास्त्रांची संख्या वाढत असून, फिलिपाइन्सनंतर आता मुस्लिम देश इंडोनेशियालाही भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आकर्षित केले आहे. त्यासाठी इंडोनेशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीला लागले असून याबाबत दोन्ही देशांमध्ये लवकरच करार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारत-रशियन ब्रम्होस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी भारत इंडोनेशियाशी करार अंतिम टप्प्यात आहे असे वृत्त फायनान्शिअल एक्सप्रेसने प्रकाशित केले आहे. भारत आणि रशियाने संयुक्तपणे ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा करार निश्चित होण्याची शक्यता आहे.

भारत इंडोनेशियाला अँटीशिप ब्रम्होस क्षेपणास्त्राची विक्री करणार आहे. ब्रम्होस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमने क्षेपणास्त्र देण्यापूर्वी इंडोनेशियाच्या शिपयार्डला भेट दिल्याचेदेखील सांगितले जात आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये हा करार निश्चित झाल्यास भारताकडून क्षेपणास्त्रे खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा आशियाई देश असणार आहे.

यापूर्वीही विकत घेण्याची इच्छा व्यक्त
ब्रम्होस हे अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाहता इंडोनेशियाने २०१८ मध्येच ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काही कारणांमुळे हे होऊ शकले नाही. तर, दुसरीकडे या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि फिलीपिन्सने ब्रम्होस क्षेपणास्त्रासाठी ३७४९६ दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. भारताकडून हे क्षेपणास्त्र विकत घेणारा फिलिपाइन्स हा पहिला देश ठरला होता.

ब्रम्होस क्षेपणास्त्राचे वैशिष्टे
जगातील अनेक देश ब्रम्होसच्या शक्तीने प्रभावित आहेत. ब्रम्होस हे कमी पल्ल्याच्या हायस्पीड सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे विमान, जहाज, जमीन आणि पाणबुड्यांवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते. ब्रम्होस क्षेपणास्त्र मॅक २.८ च्या वेगाने हल्ला करण्यास सक्षम आहे. म्हणजेच त्याचा वेग आवाजाच्या वेगाच्या तिप्पट आहे. याची लांबी सुमारे ८.४ मीटर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या