इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काल झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अजूनही काही लोक यात अडकल्याची भीती असल्याने शोधमोहीम सातत्याने सुरू आहे.
संपूर्ण देशात काल रामनवमीचा उत्साह होता मात्र इंदूरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात असणा-या मंदिरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवरील छताचा काही भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक काय झाले ते कोणालाच समजले नाही. तरीही स्थानिक लोक सक्रिय झाले आणि त्यांनी दहा जणांना बाहेर काढले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे.