27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रइंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडली

इंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडली

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने येत्या आठवड्याभरातील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. एक पत्रक काढून इंदुरीकर यांनी स्वत: याची माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अचानक तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे २३ मे पासून ३० मे पर्यंतचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सर्व रद्द करण्यात येत आहेत. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांची गैरसोय होणार आहे. यासाठी मी दिलगीर आहे. उपचारांनंतर तब्येत पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, तोपर्यंत सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी असोत असे इंदुरीकर यांनी पत्रकात म्हटले आहे. इंदुरीकर यांच्या कारला नुकताच जालन्यातील परतूर इथे मोठा अपघात झाला होता, यातून ते बचावले होते. इंदुरीकर यांच्या स्कॉर्पिओ कारनं ट्रॅक्टरला धडक दिली होती. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत त्यांना मदत केली होती. यामध्ये इंदुरीकर यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या