24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमनाशकात उद्योगपतीची हत्या; कालव्यात आढळला मृतदेह

नाशकात उद्योगपतीची हत्या; कालव्यात आढळला मृतदेह

एकमत ऑनलाईन

नाशिक : शहरातील एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक शाळेचे बेंच बनविणा-या कारखान्याचे संचालक शिरीष सोनवणे हे बेपत्ता होते. परंतु, त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मिळून आला. मृत सोनवणे यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष गुलाबराव सोनवणे (५६, रा. के. जे. मेहता हायस्कूल, नाशिक रोड) असे मृत उद्योजकाचे नाव आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत.

एकलहरे रोडवरील स्वस्तिक फर्निचर या कारखान्यात शाळेत विद्यार्थ्यांसाठी लागणारे बेंच तयार केले जातात. या कारखान्याचे मालक शिरीष गुलाबराव सोनवणे हे शुक्रवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास कारखान्यात असताना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तींपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडीजवळ बोलविण्यास सांगितले पण फिरोज याने त्यांना नकार देत आपणच कारखान्यात या आणि काय ते बोला असे सांगितले; परंतु गाडीत बसलेल्या व्यक्तीने आपण अपंग असून चालता येत नाही असे सांगत सोनवणे यांना गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले.

दरम्यान फिरोज यांना चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला. पण बराच वेळ झाला तरी मालक आत आले नाहीत तसेच, गाडी सिन्नर फाटाच्या दिशेने जाताना कामगारांनी पाहिल्याचे कळाले. यानंतर सोनवणे यांच्या पत्नी यांचा कारखान्यात फोन आला आणि मालक सोनवणे यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली. यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाहीत. यानंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते तेथे न दिसल्याने शनिवारी (दि. १०) नाशिक रोड पोलिस ठाण्यात मालक सोनवणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके रवाना करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू असताना मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील पाटबंधारे कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर नातेवाईकांना कळविण्यात आले व नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. स्वस्तिक फर्निचर कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे हे अनेक दिवसांपासून बंद असल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या