28.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home उस्मानाबाद तुळजापूर येथे भक्त निवास कोवीड सेंटरमध्ये निकृष्ट जेवण

तुळजापूर येथे भक्त निवास कोवीड सेंटरमध्ये निकृष्ट जेवण

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर येथील कोवीड सेंटर येथे कोरोना बाधीत रूग्णांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे. व दोन्ही सेंटर अस्वच्छ असल्याने तात्काळ चौकशी करून संबंधीतावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे सोमवारी (दि.२४) निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तुळजापूर येथे १२४ व १०८ भक्त निवास कोवीड सेंटर आहेत येथे एकूण १२१ लोक कोरोना पॉझिटीव्ह व ५७ लोक विलगीकरण आहेत. या दोन्ही सेंटरमध्ये अ‍ॅड. अनिल काळे हे प्रत्यक्ष जावून पाहणी केलेली आहे. तेथे प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असून त्याचा रूग्णांना त्रास होत आहे. तसेच दोन्ही सेंटरमध्ये लोकांना जे जेवण पुरखले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये आळया व किडे निघत आहेत.

त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याऐवजी वाढण्याचा संभव आधिक झालेला आहे. कोरोनाच्या भितीने नागरीक त्रस्त असून लोकांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. या सर्व प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व बाधीत लोकांना न्याय द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे. या निवेदनावर अ‍ॅड. अनिल काळे यांची स्वाक्षरी आहे.

तुळजापूर कोविड सेंटरमध्ये निकृष्ठ आहार पुरावल्याबद्दल चौकशी करून कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. कोविड सेंटरमध्ये अस्वछता व कोरोना बाधितांना तात्काळ संबंधितांना बोलावून बैठक घेतली. व चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

भुकेनं तडफडून मेलेल्या चिमुरडीची मानवाधिकार कडून गंभीर दखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या