24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमहागाई दराचा उच्चांक कायम

महागाई दराचा उच्चांक कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महागाईने होरपळणा-या सर्वसामान्यांना काही केल्या दिलासा मिळताना दिसत नाही. ऑगस्ट २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर ६.७१ टक्के होता, तर जूनमध्ये ७.०१ इतक्या किरकोळ महागाईदराची नोंद करण्यात आली होती, तर मे २०२२ मध्ये हा दर ७.०४ टक्क्यांवर होता. एप्रिलमध्ये हाच दर ७.७९ टक्के होते.

ऑगस्ट महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शहरी भागातील अन्नधान्य महागाई जुलैमध्ये ६.६९ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये शहरी भागात ३.२८ टक्के खाद्यान्न महागाईची नोंद करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात हाच महागाई दर ७.६० टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. जो जुलैमध्ये ६.७३ टक्के होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईचा दर ३.०८ टक्के होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या