20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय WHO ला दिली माहिती : 7 दिवसांत रुग्ण बरा; भारतीय डॉक्टरनं औषध...

WHO ला दिली माहिती : 7 दिवसांत रुग्ण बरा; भारतीय डॉक्टरनं औषध शोधल्याचा दावा

एकमत ऑनलाईन

44 रुग्णावर उपचार केल्याचा दावा : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी  प्रयत्नांचे  केले कौतुक

जयपूर : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना लसीचा शोध सुरु असताना राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या एका होमिओपॅथीक डॉक्टरने दावा केला आहे की, कोरोना रुग्ण त्यांच्या औषधांमुळे 7 दिवसांत बरे होतात. आतापर्यंत 44 रुग्णावर उपचार केल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे. डॉ. अजय यादव असे या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवावर एक पुस्तकही लिहले असून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

जरी या कोरोनाच्या काळात होमिओपॅथीक औषधांना मान्यता नसली तरी आता होमिओपॅथीक औषधामुळे 44 रुग्ण बरे झाले असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा जयपूरमधील नामांकित होमिओपॅथी डॉक्टर अजय यादव यांनी केला आहे. होमिओपॅथी पद्धतीने आपण संक्रमित 44 रुग्णांना बरे केले असल्याचा दावा डॉ. यादव यांनी केला आहे.

डॉ. अजय यादव यांनी कोरोनावर औषध तयार करण्यासाठी दीड महिन्याहून अधिक काळ संशोधन केले आहे. डॉ. यादव यांनी ब्रोमियम म्हणजेच ब्रोमिन गॅस, क्लोरियम म्हणजेच क्लोरीन आणि ओजना म्हणजेच निसर्गाच्या ओझोनची फिल्टरिंग थर किंवा O3, हे तीन होमिओपॅथीच्या औषधे आणि मानवी वर्तन यावर संशोधन केले.

Read More  भारत जगात पाचव्या स्थानावर!

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर आणि लक्षणांवर आधारीत ही तीन औषधे रुग्णाला स्वतंत्रपणे दिले जाते. तिन्ही औषधे कोरोनासारख्या विषाणूला मारतात, जसे विषाने विष मारले जाते. डॉ. अजय यादव यांच्या मते, ब्रोमियम औषधामध्ये जास्त उष्णता असते आणि तणावात वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन औषधांचे दुष्परिणाम क्लोरमपासून प्रतिकारशक्ती वाढवून रुग्ण बरे करता येतात. ही औषधे शरीरात प्रवेश करून तसेच एचओबीआर आणि एओसीएल तयार करून कोरोना विषाणूचा नाश करतात. यादव यांचा असाही एक दावा आहे की, होमिओपॅथीची औषधे त्या माणसाच्या वागणूकीवर आणि त्याच्या स्वभावावर अवलंबून असतात आणि अशा परिस्थितीत ते प्रभावी ठरतात.

डॉ. यादव यांच्या या कार्याला राजस्थानचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप कुमार बुराड हे देखील सहमत आहेत. ते म्हणाले की, त्यांनी केवळ 7 दिवसातच रुग्ण बरे होतात हे आपण पाहिले आहे. आणि याच कारणास्तव त्यांनी आपल्या अनुभवाद्वारे हे सरकारलाही सांगितले आहे. आता सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत कळवले आहे. जेणेकरून त्यावर जे काही कागदोपत्री काम असेल ते केले जाईल.

दरम्यान, डॉ. अजय यांनी ‘मिस्ट्री ऑफ कोरोना’ नावाच्या पुस्तकात आपला अनुभव प्रसिद्ध करून हे पुस्त मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले आहे. जेणेकरून होमिओपॅथिक पद्धतीने कोरोना संपविण्याच्या प्रयत्नांचा पाठपुरावा सरकार करू शकेल. अशा परिस्थितीत हे सांगणे चुकीचे आहे की बाजारात अधिकृत लस बाजारात येत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतींचा अवलंब करून कोरोनाचे संक्रमणाचा फैलाव थांबवावा लागेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या