Sunday, September 24, 2023

तरुणांसाठी इनोव्हेशन चॅलेंज

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेऊन मोदी सरकारने आता चीनची चौफेर आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. एकीकडे चीनसोबतचे बरेच करार रद्द करतानाच टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. आता वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तरुणांना चॅलेंज दिले आहे.

या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज लॉंच केले आहे. या माध्यमातून भारतीयांना २० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस ळपान ५ वर
जिंकण्याची संधी मिळणार आहे. या चॅलेंजची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्टच्या माध्यमातून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज लॉन्च करत असल्याचे म्हटले. आज मेड इन इंडिया अ‍ॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करण्यात येत आहे.तुम्हाला जर आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टिकोन व क्षमता आहे, असे वाटत असेल, तर टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जा, असे आवाहनही त्यांनी केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशनच्या संयुक्त विद्यमाने निती आयोगाने हे इनोव्हेशन अ‍ॅप लॉंच केले आहे.

अ‍ॅप्स, मोबाईल गेम निर्मितीसाठी प्रोत्साहन
आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेंजच्या माध्यमातून मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि फोटो व्हीडीओ एडिटिंग अ‍ॅप तयार करण्यात येणार आहेत. यासाठी २० लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. या अ‍ॅपला मेक इन इंडिया फॉर इंडिया अ‍ॅण्ड द वर्ल्ड अशा नावाचा मंत्र दिला आहे. याचा मुख्य उद्देश भारतीय तरुणांना मक इन इंडिया अ‍ॅप्स तयार करण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. ज्यांना या चॅलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी इनोव्हेट डॉट मायजीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन दि. १८ जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More  चीनला लावला ब्रेक, हिरो सायकलने रद्द केली ९०० कोटींची डिल

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या