मुंबई : देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय नौसेनेने विदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणि सिलिंडर आणण्यासाठी एकत्र आले आहेत. ऑपरेशन समुद्र सेतूच्या माध्यमातून सोमवार दि़ १० मे रोजी नौसेनेने युद्धपातळीवर लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर आणि कंटेनर्स त्याचबरोबर इतर वैद्यकीय उपकरणे भारतात आणली आहेत. कतार, कुवैत आणि सिंगापूर येथून लिक्विड ऑक्सिजन आणि कंटेनर्स भारतात दाखल झाले आहेत.
ऑपरेशन समुद्र सेतूचा भाग दोन असलेल्या भारतीय नौदलाचे त्रिकंड हे जहाज कतार हमद बंदरावरुन लिक्विड मेडीकल ऑक्सिजन आणि कंटेनर्स घेऊन मुंबईच्या डॉकयार्डमध्ये दाखल झाले आहे. आयएनएस त्रिकंडचे मुंबईच्या डॉकयार्डमध्ये आगमन झाले आहे. २० मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन कठर त्रिकंड मुंबईत पोहचली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला फ्रेंच सरकारची मदत केली आहे.
दोन महिन्यांत ६०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणार
भारताला मदत करण्यासाठी फ्रान्स उपक्रम राबवणार आहे. कतार ते भारतपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. कतारमधील राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यात भारताला फ्रेंच सरकारकडून आणखी ६०० मेट्रीक टनचा पुरवठा होणार आहे. त्रिकंड हे जहाज ५ मे रोजी कतारमध्ये गेले त्यानंतर आता १० मे रोजी त्रिकंड मुंबईत दाखल झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील पहिली मालवाहतूक
आंतराष्ट्रीय बाजारातून ही पहिला मालवाहतूक करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्याचबरोबर सोनिया बार्बरी, कॉसुल जनरल, फ्रेंच वाणिज्य द्रूतावास ही उपस्थित होते. आज सकाळी आयएनएस ऐरावत जहाज सिंगापूरहून ८ ऑक्सिजन सिलिंडर आणि वैद्यकीय साहित्य घेऊन विशाखापट्टणमला दाखल झाले.
यंदाही कृषि क्षेत्राची घोडदौड असणार